पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या तारसा येथे किराणा दुकानाचे शटर तोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस तांत्रिक माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी आरोपीस ताब्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. अर्जुन ज्ञानेश्वर हटवार वय 36 राहणार तारसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्हा ची कबुली दिली.आरोपिकडून 15 हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.