पाचोरा: झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला समता सैनिक दलाचा दणका सर्वच मागण्या मान्य, नवव्या दिवशी उपोषणाची सांगता,
विविध मागण्यांसाठी समता सैनिक दलाचे उपोषण गेल्या 9 दिवसांपासून पाचोरा तहसील आवारात सुरू होते मात्र आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी उपोषणाच्या नवव्या दिवशी प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या व त्या सोडण्यात देखील आल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली असल्याची माहिती दुपारी 2 वाजता उपोषणकर्त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिली आहे,