कन्नड आगाराच्या धुळे–छत्रपती संभाजीनगर बसमध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला बसवाहक रंजना सोनवणे यांना मारहाण करण्यात आली.हतनूर बसस्थानकात दोन अनोळखी महिलांनी बसच्या केबिनमध्ये बसण्याचा प्रयत्न केल्याने वाद झाला.सूचना दिल्याचा राग धरून संबंधित महिलांनी शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून कन्नड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.सदरील घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.