आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठूमाऊलीच्या दर्शनाची प्रत्येकाला ओढ असते परंतु सगळ्यांनाच पंढरपूरला जाणे शक्य होत नाही म्हणून दरवर्षी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी कुऱ्हा येथे परिसरातील भाविक भक्तांना श्री विठूरायाचे दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल दर्शनाचा देखावा साकारत असतात.आज कुऱ्हा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी विठूरायाचे दर्शन घेतले.