ऐतिहासिक तथा पर्यटन नगरी असलेल्या भद्रावती शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व शोभेसाठी मुख्य रस्त्याच्या द्विभाजकांवर विवीध ठिकाणी वन्यप्राणी तथा पक्षांचे पुतळे उभारले आहे. मात्र अज्ञात समाजकंटकांनी नागमंदिर चौकात असलेल्या बगळा पक्षाच्या पुतळ्याचे मुंडके तोडून विद्रुपीकरण केल्याने शहराच्या सुंदरतेला गालबोट लागले आहे.सदर बाब काही नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली आहे.