मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग मराठी येथे दि. 17 जानेवारी रोजी कंपनीत कार्यरत क्रेन ऑपरेटर मारोती भिवगडे हे उंचीवरून पडल्याने मृत्यू झाला. दरम्यान, जखमीला भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी दरम्यान मारोती भिवगडे याला मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवाल व फिर्यादी लक्ष्मण भिवगडे यांच्या तक्रारीवरून घटनेची नोंद वरठी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.