आळेफाटा (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आळे येथे वास्तव्यास असलेला खालीद अहमद गुलामगौस बेपारी (वय ५८) या सराईत आरोपीस एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर येथील कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.