शशिकरण नदीच्या काठालगतच्या परिसरात सलग काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी गुराखी व नदीकाठाने ये जा करणाऱ्या नागरिकांनी बिबट्याचे ठसे व हालचाली पाहिल्याची माहिती दिली आहे सदर प्रकारामुळे शेतात कामासाठी जाणे तसेच लहान मुलांची ये जा धोकादायक ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे वन विभागाने तातडीने पाहणी करून पिंजरा लावणे गस्त वाढवणे व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याची मागणी होत आहे