वहिनीच्या हत्येप्रकरणी चुलत दिराला जन्मठेप; मुलाच्या तक्रारीमुळे सात वर्षांनंतर गुन्हा उघड श्रीगोंदा येथील सुमनबाई गोरड यांच्या २०१७ साली झालेल्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी चुलत दीर धुळा बाबा गोरड (वय ४२) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उसन्या दिलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून आरोपीने सुमनबाईंच्या डोक्यावर दगड व पाईपने प्रहार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत गाडून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.