गावातील सार्वजनिक चौकात काही मित्रांसोबत बसला असताना आरोपीने तेथे येऊन मला तुमच्यासोबत कामाला कान येत नाहीत या विषयावरून शिवीगाळ करून भांडण करीत तिथे असलेली एक लाकडी काठी उचलून डोक्याला व हाता पायाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास निघवी येथे घडली. या घटनेत चंद्रहास शालीकराम वासनिक (२८) यांच्या तक्रारीवरून विलास सोमाजी माळवळे (४०) यांच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.