नेवासा नगरपंचायत निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांचा पराभव करीत शिवसेनेचे करणसिंह घुले यांनी १ हजार ९६५ मतांनी विजय मिळवत नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे.क्रांतीकारी शेतकरी पक्षाने ९ जागा मिळवून बहुमत मिळवले असले तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने "गड आला पण सिंह गेला" अशी परिस्थिती नेवाशात झाली आहे.