कळमनूरी: पोत्रा शिवारात बिबट्याचा अजूनही वावर,नागरिकात भीतीचे वातावरण,वनविभागाचे पथक दाखल
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा संचार झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून,तेथील महादेवाच्या डोंगरावर बिबट्या जात असताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष दर्शनी पाहिला असल्याची माहिती आज दि. 27 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे.यावेळी वनविभागाच्या पथकाला माहिती मिळतात या ठिकाणी वनविभागाचे पथक येऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.तात्काळ बिबट्याचा शोध घेऊन इतरत्र हलवावा अशी मागणी पोत्रा सिंदगी तेलंगवाडी येथील नागरिकांनी वन विभागाकडे केली