यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे दलित, शोषित, वंचित घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवा सेनेच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक युवकांचा रिपब्लिकन युवा सेनेकडे ओढा वाढला असून, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक युवकांनी जिल्हा संपर्क कार्यालय उमरखेड येथे रिपब्लिकन युवासेनेत पक्ष प्रवेश केला.