तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी आज शनिवारी (ता. ३ जानेवारी) सकाळी ११ वाजता शहर व परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. बसस्थानक चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी ११ वाजल्यापासून टाळ-मृदंगाच्या निनादात शांततेत भजन आंदोलन छेडण्यात आले.