बायोडिझेल पंपाचे टाके साफ करण्यासाठी टाक्यामध्ये उतरलेल्या दोघांचा विषारी गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणात नांदुरा पोलिसांनी मलकापूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद खाँ जमादार यांचा मुलगा जमील खाँ रशीदखा (वय ४२) याला मलकापूर येथून ता. २४ नोव्हेंबर रोजी अटक केली.दरम्यान न्यायालयीन कामासाठी ता. २४ नोव्हेंबर रोजी मलकापूर न्यायालयात येणार असल्याची माहिती नांदुरा येथील ठाणेदार जयवंत सातव यांना मिळाल्यानंतर सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भोलजी पोलिसांनी अटक केली आहे.