वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशन आणि दीपचंद चौधरी विद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मुलं-मुलींच्या लंगडी स्पर्धेचे शनिवारी (३ जानेवारी) दुपारी १२.३० वाजता दीपचंद चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन दैनिक सहसिकचे संपादक रवींद्र कोटंबकर यांच्या हस्ते करण्यात आले.