अवैधरित्या गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या टोळीचा काटोल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी सरस्वती नगर भागात केलेल्या कारवाईत पोलिसांनी १ किलो ६५७ ग्रॅम गांजा आणि रोख रकमेसह एकूण १ लाख २३ हजार ६४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये सुलतान उर्फ साहिल यावर अली जाफरी आणि एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून १८,६४७ रुपये किमतीचा गांजा, १ लाख ५ हजार रुपये रोख आणि वजन काटा जप्त करण्यात आला आहे.