माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला त्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतांना दिसून आले. दरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाही रंगू लागल्या. आज अचानक अपघातामध्ये अजित पवार यांच्या झालेल्या निधनानंतर सलील देशमुख यांनी निशब्द... माझा आधार हरपला मी पोरगा झालो अशी भावनिक पोस्ट केली आहे.