भोर: घरातून बाहेर पडल्या अन् दुपारी विहिरीत सापडला मृतदेह; भोर तालुक्यातील पारवडी येथील घटना...
Bhor, Pune | Nov 19, 2025 पारवडी गावातील अलका किसन लिमण (रा. पारवडी) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले.