पवनी: भंडाऱ्यात दहा दुकाने लुटले..... नऊ चोरटे सीसीटीव्हीत कैद...... काही आरोपींना ताब्यात घेतल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती
Pauni, Bhandara | Apr 24, 2024 भंडारा शहरासह जवाहर नगर पोलिस स्टेशन हद्दीतील दहा दुकाने मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना पहाटे उघडकीस आली. त्यात किराणा मेडिकल ज्वेलर्स, स्वीट मार्ट, वाईन शॉप, पतंजली स्टोअर आदींच्या समावेश आहे. मागील काही वर्षातील ही भंडाऱ्यातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. सर्व नऊ आरोपी दुचाक्यांवरून येऊन चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भंडारा पोलिसांच्या रात्री ग्रस्त नसल्याने ही घटना घडल्याचा संताप व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे.