पारोळा: खरेदी बंद; पारोळा केंद्रावर शेतकरी आक्रमक.
सभापती डॉ. पाटलांचाही संताप; 'सीसीआय'ने मोजले एकच ट्रॅक्टर
Parola, Jalgaon | Dec 10, 2025 पारोळा --येथील रोहित जिनिंगमध्ये पंधरा दिवसांपासून 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र सुरु झाले आहे. मात्र, या ठिकाणी कापसाच्या प्रतवारीच्या धोरणानुसारच कापूस खरेदी केला जात आहे. परिणामी, पंधरा दिवसात केवळ १९७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मंगळवारी (ता. ९) शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस या ठिकाणी विक्रीसाठी आणल्यानंतर विविध कारणे सांगत हा कापूस खरेदी करण्यास उपस्थित ग्रेडर यांनी नकार दिला.