आर्वी आगार येथे आज सुरक्षितता अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम होते फौजदार संतोष चव्हाण प्रा.राजेश सोळंकी प्रमुख वक्ते होते लेखाधिकारी वसंत खिराडे बसस्थानक प्रमुख प्रवीण काळमेघ अमोल कोठवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी सुरक्षित सेवा देणाऱ्या चंद्रशेखर धुले अनिल पाऊलझाडे नितीन वांधे कमलेश कडू गणेश पोजागे यांचा सत्कार अतिथींच्या हस्ते करण्यात आला संचालन रवींद्र गणेशकर यांनी केले तर आभार संजय शिंगणे यांनी मानले..