रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम दासगाव खुर्द सितुटोला येथे दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतालगतच्या नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला सितूटोला येथील मारोती कोल्हे यांच्या शेताजवळील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली मृताचे पाय कमरेपर्यंत पाण्यात व वरचा भाग पाण्याबाहेर असल्याचे दिसून आले मृतदेहाजवळ पाण्यात निळ्या रंगाची चप्पल तरंगत होती मृताच्या अंगात रेडिमेट अंडरवियर होती व मृतदेहापासून थोडे अंतरावर नाल्यात निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट