आज दिनांक 19 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता फुलंब्री–सिल्लोड रस्त्यावर काही तरुणांनी रस्त्यातच बैलगाडी व दुचाक्या आणून गोंधळ घातला, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रात्रीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, अपघात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाल्याचेही चित्र होते. या हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील सुरक्षितता वाढवावी, अशी वाहनधारकांकडून जोरदार मागणी केली