शिरपूर तालुक्यातील निमझरी शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली असून तीन शेतकऱ्यांच्या शेतातील हजारो रुपयांचे विद्युत साहित्य चोरून नेण्यात आले आहे. ही घटना 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ पी.बी.नंदाळे करीत आहे