आर्णी: आर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीत थंड प्रतिसाद;तिसऱ्या दिवशीही एकही नामांकन अर्ज दाखल नाही
Arni, Yavatmal | Nov 12, 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येईल, अशी अपेक्षा असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवारांकडून पुढाकार दिसून आलेला नाही. दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत आर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र आज दिनांक 12 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा तिसरा दिवस असूनही एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही, ही बाब लक्षवेधी ठरत आहे. स्थानिक राजकीय पातळीवर उमेदवा