वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून रणशिंग फुंकण्यात आलंय. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने 'संघर्ष महिलांचा जागर' या मोहिमेतंर्गत भव्य मेळावा पार पडला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. असे आज 4 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे