दारव्हा: रविवारला दारव्हा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ५० अर्ज दाखल
दारव्हा नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला आज दि. १६ नोव्हेंबर रोजी मोठा वेग आला. अध्यक्षपदासाठी एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधून एकूण ५० अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.