भुदरगड: करडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने 15व्या आयोगा मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संप्पन्न
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत आज बुधवार दि.23 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भागात भात शेती हे प्रमुख पीक असल्याने सध्या रोप लागण चालू आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शिबिराचे आयोजन केले होते.