बीड तालुक्यातील मंजिरी फाटा येथे एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मंजिरी फाट्याजवळील एका ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बीड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.