रविवारला 2 तास गावासाठी, या उपक्रमाअंतर्गत आठवड्यातील एक दिवस गावासाठी उपक्रमांतर्गत भंडगा गाव परिसरात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पासून दुर्गा मंदिर पर्यंत श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.उपक्रमात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.सार्वजनिक ठिकाणे,मंदिर,बुध्द विहार,येथील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.प्लास्टिक कचरा वेगळा करण्यावर आणि ओलसर सुक्या कचऱ्याचे विभाजन करण्यावर विशेष भर देण्यात आला.