अकोट हिवरखेड मार्गावर अडीचशे कोटिंच्या वर बजेट असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरींकांमध्ये रोष असल्याचे दिसत आहे.याबाबत खंडाळा,हिवरखेड येथील जागरूक नागरिकांनी आवाज उठविणे सुरू केलेय. स्पॉटवर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून नागरिकांनी चांगलेच धारेवर धरत रोष व्यक्त केला आहे. मुरूम ऐवजी काळ्या व पांढऱ्या मातीचा सर्रास वापराच्या प्रमाणामुळे उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. सोबतच थातूर मातूर देखावा वगळता कोणत्याही ठोस तसेच पर्याप्त सुरक्षात्मत उपाय योजना नसल्याने रोष आहे.