संगमनेर: संगमनेरातील बिबट्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा
संगमनेरातील बिबट्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, जवळे कडलग येथे चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली.