रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात बँकेत दावा न केलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळण्यासाठी विशेष मोहिम सर्व बँकांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेतर्फे दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नियोजनभवनात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ बँक, पेंशन, विमा, शेअर, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी जमा राहिलेल्या व व्यवहार न झालेल्या रकमा रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये जमा केल्या जातात.