रामटेक तालुक्यातील पवनी येथे खरीप हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून केंद्राच्या कामकाजाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 5 डिसेंबरला सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान करण्यात आला. केंद्राचे उद्घाटन राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना परिसरातच सोयीस्कर सेवा उपलब्ध व्हाव्यात,प्रक्रिया सुलभ आणि कार्यक्षम व्हावी यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.