खासदार संजय देशमुख यांनी चिंचोली येथील निवासस्थानी दिग्रस नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.पंचशीला वाल्मिक इंगोले तसेच नगरसेवक श्री. के. टी. जाधव सर, श्री. राम नरळे, रुस्तम पप्पुवाले, रेहमत रमजान पटेल, श्रीमती.अरुणा रत्नपारखी आणि अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला.