भंडारा: दिवसाढवळ्या घरफोडी! कुलूप तोडून २३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास; सिंगोरीतील घटना
भंडारा तालुक्यातील मौजा सिंगोरी येथील ६५ वर्षीय सिद्धार्थ नपूंजी लोणारे यांच्या घरी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वाजण्याच्या दरम्यान चोरीची धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ लोणारे यांची पत्नी घराला कुलूप लावून सिद्धार्थ यांच्याकडे भाजीपाल्याच्या दुकानावर गेली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने सुनेचे जुने वापरातील सोन्याचे दागिने, ज्यात १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाच....