माजी वसुंधरा अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खैरी वलमाझरी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे गुरुवार दि18डिसेंबरला दुपारी चार लाआयोजन करून सभेमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सिंगल न्यूज प्लास्टिक बंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी ठराव घेण्यात आला प्लास्टिक विक्रेत्यांवर 5हजार रु तर प्लास्टिक वापरणाऱ्या वर 1हजार रु इतका दंड आकारण्यात येणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येणार असून या उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी केले