आरोग्य विभाग अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वय वंदना योजना, कुष्ठरोग शोध मोहीम ,कॅन्सर द्वारे कर्करोग तपासणी या व इतर विषयावर माहिती देण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ. सई धुरी यांनी विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सतीश गुजलवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश करतसकर , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. धनगे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. निलेश मटकर उपस्थित होते.