धुळे: धुळ्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेचे साक्री रोड कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांना निवेदन; सक्ती केल्यास 'खळळ-खट्याक'चा इशारा
Dhule, Dhule | Nov 28, 2025 राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम सुरु असतानाच आता धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला कडाडून विरोध दर्शवला आहे. स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास 'मनसे स्टाईल'ने उत्तर देऊ, असा सज्जड दमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. या मीटरमुळे वीज ग्राहकांवर कर्जाचा बोजा पडणार असल्याचे सांगत सध्याचे पोस्टपेड मीटरच कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.