पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद कनिष्ठ महाविद्यालय येथे रेझिंग डे निमित्त आज पोलीस बँड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पोलिस दलाच्या विविध भागांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने साजरे झाले. या प्रदर्शनात पोलीस बँड पथकाने आकर्षक वादन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले