गोंदिया येथे 21 ते 23 डिसेंबर दरम्यान होत असलेल्या हनुमंत कथा महोत्सवाच्या निमित्ताने कथा व्यास सद्गुरु श्री ऋत्तेश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.तत्पूर्वी ऋत्तेश्वरजी महाराजांचे रामनगर येथे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी सर्वांना हनुमंत कथा महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी ऋत्तेश्वरजी महाराज यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत हनुमंत कथेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले.