जालना शहरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवण्यात येणार्या शासकीय मुलींच्या वसतिगृहातील भोजनात अळ्या आढळल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे वसतिगृहात राहणार्या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे लेखी तक्रार देत सखोल चौकशीची मागणी केली आहे.