भूतबाधा असल्याची भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. तक्रारदार गोविंदा विठ्ठल बावनकर पोलीस स्टेशन वेलतुर येथे दिलेल्या तक्रारीनुसार 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आरोपीने तक्रारदार यास भूतबाधा असल्याची बतावणी करून जडिबुटी घेण्यास भाग पडून 1 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यावरून आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.