दारव्हा: अध्यक्षपदासाठी २७ तर सदस्य पदासाठी तब्बल १६२ उमेदवारांचे अर्ज
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले अर्ज सादर करण्यासाठी निवडणूक कार्यालयात मोठी रांग लावली होती.अध्यक्षपदासाठी २७ तर सदस्य पदासाठी तब्बल १६२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक 18 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.