अंबड तालुक्यातील जामखेड येथील खारुळ तळ्यात युवक बेपत्ता शोध मोहीम सुरूच , परिसरात खळबळ अंबड तालुक्यातील जामखेड गावाजवळील खारुळ तळ्यात एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रामनाथ फकीरराव भोजने (वय अंदाजे 39 वर्षे, रा. जामखेड) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. ते शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, शेतात