बेलाटी/कोंढाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शंकरपट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांनी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास या सोहळ्यास विशेष उपस्थिती लावून विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप केले. यावेळी बोलताना आमदार नाना पटोले यांनी ग्रामीण परंपरेचे प्रतीक असलेल्या शंकरपटाच्या जतनावर भर दिला.