अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मोसंबी व संत्रा उत्पादकाचे गेल्या मृग बहार णे पूर्णतः नुकसान झाले मात्र कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याने साहूर परिसरातील मोसंबी संत्रा उत्पादक यांनी आष्टी तहसील कार्यालयावर धडक दिली अनुदानापासून वंचित ठेवले तर आंदोलन करण्यात येणार असा इशारा यावेळी देण्यात आला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अशी माहिती आज सकाळी शेतकरी राजू काकपुरे यांनी दिली आहे