कादरीनगरमध्ये गोवंशाची कत्तल; मुद्देमाल जप्त संगमनेर : शहरातील कादरीनगर, गल्ली क्रमांक ४, म दिनानगर परिसरात गोवंशाच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून तीन गायी, एक वासरू, तसेच सुमारे ७०० किलो गोमांस, असा एकूण २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान मुख्य आरोपीसह पाच अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेत फरार झाले.