बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची घटना आज दि . ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा वन विभागाच्या चनाखा बीटमधील विहिरगाव राऊंड, कक्ष क्रमांक १६० येथे रेल्वे रुळावरून मालगाडी जात असताना ही वाघीण रूळ ओलांडत होती. त्याचवेळी तिला रेल्वेने जोरदार धडक दिली.